बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस घेतली म्हणजे आता सर्व काही संपलं असं नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | आज आपण क्रांतिकारी पाऊल टाकलं आहे. मात्र अजूनही संकट टळलेलं नाही. लस घेतली म्हणजे सर्व काही संपलं असं नाही. अजूनही हजारो लोकांना लस द्यायची बाकी आहे. सर्वांना लस देण्यासाठी काही महिने लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

लस घेतल्यानंतरही मास्क वापरावाच लागणार आहे. मास्क लावणं, हात धुणं आणि अंतर ठेवणं या त्रिसूत्रीद्वारे आपण कोरोनावर मात केली आहे. ही त्रिसूत्री कायम पाळा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

…नाहीतर मीच पहिली लस घेतली असती- उद्धव ठाकरे

तुम्हालाही ‘हा’ मेसेज आला असेल तर सावधान; तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात!

“कमळाच्या फुलातील भुंगा म्हणजे मियाँ औवेसी”

प्रसिद्ध अभिनेत्यावर पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराचे आरोप

“पवारांचा दुटप्पीपणा महाराष्ट्राची जनता बघत असून राष्ट्रवादीला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More