बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, तर…- गिरीश महाजन

नाशिक | घरात बसून हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही. खांद्याला खांदा लावून काम करा, असं मत यावेळी गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढली. मुंबईत कोरोनाने कहर केला आहे. अक्षरशः धिंगाणा घातला आहे. राज्य सरकारने ढिसाळ निर्णय घेतले म्हणूनच महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

टेस्टिंगबाबत मोठा गोंधळ आहे. जळगावला तर 12 दिवसांनी रिपोर्ट येतो. म्हणून झपाट्याने संख्या वाढली. दुर्दैवाने अजून चांगलं काम नाही. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्यात समन्वय नाही. घरात बसून भाषण ऐकायला चांगलं वाटतं मात्र सरकार अपयशी ठरलं आहे. संख्या वाढू नये म्हणून आकडे लपवत बसू नका, असं गिरीश महाजन म्हणाले आहेत.

चक्रीवादळामुळे कोकणात मोठं नुकसान झालं. त्यासाठी 100 कोटी रुपयांच्या मदतीने काही होणार नाही. मुख्यमंत्र्यानी मोठी मदत करावी, अशी मागणीही गिरीश महाजन यांनी यावेळी केली.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीस आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल- हसन मुश्रीफ

“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”

महत्वाच्या बातम्या-

ठाकरे सरकारचा दणका; विनाकारण भीती दाखवून अ‌ॅडमिट करणाऱ्या रुग्णालयावर कारवाई

55 वर्षांपुढील पोलिसांसाठी राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतात ते करून दाखवतात- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More