जळगाव | मागील 3 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी आत्महत्या केलीये. यावरून भाजपा नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
दरम्यान गिरीश महाजन यांनी चौधरी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी गिरीश महाजन म्हणाले, “सरकार गेंड्याच्या कातडीचं असून त्यांना या सरकारला कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. दिवाळीचा सण तोंडावर असताना सरकार 4 महिने लोकांना पगार देत नाहीत.”
“तीन तिघाडा अन् काम बिघाडा.. अशा पद्धतीने सरकार चाललंय. एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केलीये. परंतु सरकारला अजूनही जाग नाही. कुणीही या पीडित कुटुंबीयांना भेटायलाही तयार नाही. हे सरकार संवेदनाहीन झालंय,” असंही गिरीश महाजन म्हणाले.
मनोज चौधरी यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय.
महत्वाच्या बातम्या-
“आम्ही अंतिम फेरीपर्यंत पोहचू शकलो नाही ही खरंच शरमेची गोष्ट
‘त्या’ वक्तव्यावर खडसेंनी माफी मागावी अन्यथा…; ब्राम्हण महासंघाचा इशारा
राज्यपाल कोश्यारींचा गृहमंत्र्यांना फोन; अर्णब गोस्वामींच्या प्रकृती आणि सुरक्षेबाबत चिंता व्यक्त
‘ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या’; मुंबई पालिकेचं आवाहन
लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय