बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झाडं लावून झाडांच्या मुळांशी अस्थीविसर्जन, वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी मुलीचा स्तुत्य निर्णय

पुणे | भारतीय जनता पक्ष युवा मोर्च्याच्या माजी सचिव आणि मेदनकरवाडी गावाच्या माजी सरपंच प्रियंका चौधरी यांनी समाजासमोर एक नविन आदर्श ठेवला आहे. प्रियंका चौधरी यांचे वडील रामदास मेदनकर यांचं नुकतंच निधन झालं होतं. रामदास मेदनकर यांना कायम स्वरूपी आठवणीत सामावण्यासाठी मेदनकर कुटूंबीयांनी अस्थींचे विर्सजन न करता झाडांच्यामध्ये सोडून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला होता.

रामदास मेदनकर झाडांच्या रूपात कायम आमच्या सोबत राहतील यासाठी अस्थींचे विर्सजन न करता त्यांच्या स्मरणार्थ सर्व मेदनकर कुटूंबीयांनी सर्व अस्थी नदीत न सोडता ते झाडांच्यामध्ये सोडून वृक्षारोपण करून एक नविन आदर्श समाजासमोर ठेवला आहे. लाकूड वापरून अंत्यसंस्कार केल्यानंतर साधारण 25 ते 30 किलो रक्षा तयार होते व नंतर ती ओढा किंवा नदीत सोडल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो. यामुळेच मेदनकरवाडी गावात वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आंबा, पारिजातक, आवळा, बहावा, रक्तचंदन या झाडांचे वृक्षारोपण करून संपूर्ण अस्थी प्रत्येक झाडांमध्ये सोडण्यात आल्या आहेत.

माणसांच्या सावलीला आपण उभे राहत नाही पण आपण झाडांच्या सावलीला कायम उभे राहतो हा दृष्टिकोन ठेवून यापुढे सर्वांना अंत्यसंस्कारांच्या अस्थींचे नदी अथवा ओढ्यात न सोडता वृक्षारोपण करून त्यात सोडाव्या, असं मत प्रियंका चौधरी यांचे पती आणि भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, मेदनकरवाडीची सर्वात तरुण सरपंच म्हणून प्रियंका चौधरी यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला होता. त्यांनी कोरोनाकाळात गावातील ग्रामस्थांसाठी केलेल्या कामाचं पंतप्रधानांनी कौतूक देखील केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कंपनीकडून ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज; कोरोनाकाळात ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न

आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

“अजित पवारांनी कोवॅक्सिन लस निर्मितीचा प्रकल्प राजकीय वजन वापरून पुण्याला पळवला”

कोविशिल्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आरोग्य मंत्रालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

कोरोनातून बरे झालेल्या लहान मुलांना ‘या’ नव्या आजाराचा धोका, नागपूरमध्ये रुग्ण वाढले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More