Top News महाराष्ट्र मुंबई

सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं- बाळा नांदगावकर

मुंबई | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेचे संस्थापक सायरस पुनावाला यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन सन्मानित करणात यावं, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर राज्य सरकारकडे यांनी केली आहे.

सायरस पुनावाला हे सीरम इन्स्टिट्युटच्या माध्यमाने गेली अनेक दशके विविध रोगांवर लस उपलब्ध करून देत आहेत. या महामारीत सुद्धा पूर्ण जगाला त्यांनी लसीचे मोठया प्रमाणात उत्पादन करून मोठा दिलासा दिला असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

सायरस पुनावाला यांचं कार्य हे महाराष्ट्राचे आणि देशाचं नाव उंचावणारं आहे, असं भूषणावह कार्य करणाऱ्या सायरस पुनावाला यांना “महाराष्ट्र भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे हि विनंती, असं नांदगावकरांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोनाची एक लस सरकारला अडीचशे रुपयांना दिली जाईल, असं जाहीर केलं आहे. तसेच एकूण लसीच्या 90 टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

भारताचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या गाडीला अपघात!

“संजय राऊत यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा

‘सत्ता विश्वासघाताने मिळवता येते पण…’; भाजपची शिवसेनेवर टीका

आंतरराष्ट्रीय विमानांवर 31 जानेवारीपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा निर्णय

“रोहित पवारांवर निवडणुक आयोगानं कारवाई करावी”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या