बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीमध्ये स्कीनला द्या आणखी ग्लो, करा ‘हे’ घरगुती उपाय

मुंबई | दिवाळी तोंडावर येत आहे. त्यामुळे आता स्त्रिया आणि त्यांना मदत करण्यासाठी मुली देखील अनेक कामाला लागल्या आहेत. यामध्ये घराची साफ सफाई, दिवाळीची खरेदी, फराळ अशा अनेक गोष्टींमध्ये चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतो.

दिवाळीची खरेदी करायला गेल्यावर चेहरा आणि धुळीचा प्रचंड संपर्क होतो. त्यामुळे बाहेर जाताना सनस्क्रीन लावून जावं. तसेच थंडीमुळे चेहरा ड्राय पडतो. त्यासाठी क्लिनझरचा वापर करावा. तसेच क्लिनझर वापरल्यानंतर चेहऱ्यावर कापसाने गुलाब पाणी लावावं.

दिवाळीमध्ये लहान मुलं रस्त्यावर फटाके वाजवतात. यामध्ये होणाऱ्या प्रदुषणाचा चेहऱ्यावर परिणाम होतो. त्यामुळे घरातून बाहेर जाताना सनस्क्रीन लावावी. दिवाळीची साफसफाई करताना चेहऱ्यावर धूळ पडते त्याने चेहरा ड्राय आणि काळा पडू शकतो. त्यामुळे साफ सफाई झाली की चेहरा क्लिनझिंग करुन घ्यावा.

दरम्यान, हिवाळ्यामुळे तसेच प्रदुषणामुळे चेहरा काळा पडू शकतो. त्यासाठी मधाने चेहऱ्याची मसाज करावी. याने चेहऱ्यावर ग्लो येईल. 10 मिनिटे मधाने चेहऱ्याची मसाज करावी. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.

थोडक्यात बातम्या-

भाजपचे ‘हे’ माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल

“लवकरच पेट्रोल-डिझेल तारण कर्ज सुरू होणार”, मराठी अभिनेत्याचा खोचक टोला

…अन् वकिलांच्या ‘या’ जबरदस्त युक्तिवादामुळे आर्यनचा जामीन झाला मंजूर

“मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केलं”

सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती बिघडली, कावेरी रुग्णालयात दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More