बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बलात्कार करणाऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करू”

मुंबई | साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या घटनेचे पडसाद आता मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशातच आता याप्रकरणावरुन विरोधी पक्षानं सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.

साकीनाक्यामध्ये शुक्रवारी झालेल्या बलात्कार प्रकरणात मोहन चौहान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने पीडित महिलेच्या गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला होता. अखेर या महिलेची झुंज अपयशी ठरली आहे. आता मनसेच्या रुपाली पाटील यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

रुपाली पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, सरकारला बलात्कार करणाऱ्यांवर कारवाई करता येत नसेल तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याचा चौरंग करु. त्यामुळे न्याय इथेच होणार, असं रुपाली पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे देशातच संतापाची लाट उसळली आहे. यामुळे सरकारला महिलांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रश्न केले जात आहेत.

थोडक्यात बातम्य़ा – 

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर

सिद्धार्थच्या आत्म्याशी संवाद साधल्याचा ‘या’ व्यक्तीनं केला दावा, संवादात सिद्धार्थ म्हणतो…

माझं गाणं प्रदर्शित होतं, तेव्हा लोक मला एका वेगळ्या चष्म्यातून पाहतात- अमृता फडणवीस

‘आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय’; मुनमुन संतापली

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED चं मोठं पाऊल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More