पणजी | गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी आज सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. गोवा छोटं राज्य असलं तरी गोवा राजकारणात सतत अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे गोव्यात सत्ता कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Assembly Election 2022)
गोव्यात सध्या भाजपची सत्ता आहे. मात्र, भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती. त्यात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार गोव्यात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काँटे की टक्कर पाहायला मिळाली होती. त्यामुळे गोव्यात भाजप त्यांची सत्ता कायम राखणार की काँग्रेस भाजपला मात देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार सामना रंगलेला असताना शिवसेना देखील संपुर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि आपसह उत्पल पर्रीकर व अनेक अपक्ष उमेदवार देखील रणांगणात आहेत. यामुळे मोठ्या पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यामुळे गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार?, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गोव्याची सत्ता कोणाला मिळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे.
थोडक्यात बातम्या-
कुणाला मिळणार जनतेचा कौल?; 5 राज्यांचं भवितव्य ठरणार
“…हे तर लोकशाहीचा गळा घोटण्यासारखंच”, उच्च न्यायालयाचे ताशेरे
“घातपाताची आम्हाला शंका होती, आतमध्ये सगळे एकमेकांवर आदळत होते अन्…”
“1993च्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ताज्या, उद्धवजी मांडीला मांडी लावून…”
सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ सुट्या, केंद्र सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
Comments are closed.