Top News पुणे महाराष्ट्र

अवैधरित्या दारु विकण्यासाठी घेतला देवाचा आधार; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हैराण

पुणे | पिंपरी चिंचवड शहरात नुकतीच एक आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड मधील तीन युवकांनी अवैधरित्या दारु विकण्यासाठी चक्क देवाचा आधार घेतला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील आय.टी. पार्क असलेल्या हिंजवडी परिसरात नेऱ्हे दत्तवाडी येथे अवैधरित्या दारु विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यानुसार पोलिसांनी संशयितांच्या घरावर छापा मारला आणि कारवाई केली आहे.

तपासादरम्यान संशयितांच्या घरात काहीच हाती न लागल्यामुळं पोलीस रिकाम्या हातानं परत जात असताना एका कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनं देवाच्या देव्हाऱ्याखाली हे तळघर शोधलं आणि त्या तळघरातून एक दोन नाही तर चक्क दोन हजारहून अधिक लिटर गावठी दारुचे बॅलर काढले.

दरम्यान, अवैधरित्या दारु विक्री करणारे आरोपी पुरुष नसून चक्क तीन महिला आहेत. या महिला आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

थोडक्यात बातम्या-

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का?; सदाभाऊ खोतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

मोहम्मद सिराजने धरला कुलदीपचा गळा, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; पाहा व्हिडीओ

शिवजयंतीनिमित्त सयाजी शिंदेंचा नवा संकल्प, तुम्हालाही वाटेल अभिमान!

डोक्यात गोळी मारत गोल्डमॅनला संपवलं, दिवसाढवळ्या भर चौकात गोळीबार!

“भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या