बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गुडन्यूज, कोरोनाचं टेंशन कायमचं जाण्याची शक्यता; शास्त्रज्ञांनी लावला ‘हा’ महत्त्वाचा शोध

वॉशिंग्टन | संपूर्ण जगात गेल्या वर्षभरापासून कोरोणाने थैमान घातले आहे. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्थांनी कोरोणावर लस शोधण्यासाठी प्रयत्न केले. अनेकांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश देखील प्राप्त झाले. मात्र, अद्याप कोणीही कोरोनाचा पूर्णपणे नायनाट करू शकेल असं औषध शोधू शकलं नाही. आता मात्र, प्रतिक्षा लवकरचं संपेल अशी चिन्ह दिसत आहेत. शास्त्रज्ञांनी एक कॉम्प्युटर अल्गोरिदम तयार केला आहे, की जो लसनिर्मितीमध्ये फायदेशीर ठरू शकतो.

एपिग्राफ असं या अल्गोरिदमच नाव आहे. याचा उपयोग स्वाईन फ्लूची लस शोधण्यासाठी करण्यात आला होता. इन्फ्लुएंझा या स्वाईन फ्लूचे मुळ असणाऱ्या विषाणूवर प्रभावी लस तयार करण्याचा मार्ग या एपिग्राफने दाखवला होता. त्यामुळे आता एपिग्राफ च्या मदतीने कोरोनावर प्रभावी लस तयार केली जाऊ शकते असा विश्वास वाटत आहे.

नेब्रास्का विद्यापीठातील नेब्रास्का सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी, सेंट ज्यूड चिल्ड्रेन्स रिसर्च हॉस्पिटल आणि लॉस अल्मॉस नॅशनल लॅबोरेटरी या संस्थांतील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन हे संशोधन केलं आहे. सोबतचं या संशोधनाला अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेने देखील सहाय्य केलं आहे.

दरम्यान, एचआयव्ही, एबोला आणि मार्बर्ग यांसारख्या घातक विषाणूंवर प्रभावी लस शोधण्यासाठी एपिग्राफचा वापर करण्यात आला होता. लशीचा प्रभाव वाढण्यासाठी एपिग्राफ हे टूल वेगवेगळ्या अँटिजेन्सची सरमिसळ करतं. आताच्या संशोधनामुळे फ्लूच्या मूळ विषाणूच्या सर्व रूपांना लागू पडेल, अशी लस विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल झाली आहे. अशी माहिती लॉस अल्मॉसच्या वेबसाईट द्वारे देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘संधी दवडू नका’; सोन्याच्या दरात तब्बल ‘इतक्या’ हजारांची मोठी घसरण!…

माझा काहीही संबंध नाही, अखेर पूजा चव्हाण प्रकरणात ‘त्या’ व्यक्तीनं मौन सोडलं!

बुधवारनंतर गुरुवारी पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत धक्कादायक वाढ, जाणून घ्या आकडेवारी

‘त्या’ प्रकरणावरुन अजित पवारांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच फटकारलं!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार, सिनेमात सेक्स वर्कर म्हणून दाखवलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More