बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातुन कोरोना हद्दपार, तज्ज्ञ म्हणतात…

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला. आता कोरोना संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

महाराष्ट्रातील टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी कोरोना संदर्भात मोठं आणि सकारात्मक वक्तव्य केलं आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लाट ही पूर्णपणे आटोक्यात येईल, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी केलं आहे.

महाराष्ट्रात सध्या कोरोना लसीकरणाला मोठ्या प्रमाणात वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी एकाच दिवसात महाराष्ट्रात तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली त्यामुळे देशपातळीवर महाराष्ट्राने लसीकरणाचा नवा विक्रम नोंद केला आहे.

1 मे पासून 18 वर्षांच्यावरील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. त्यासाठी लसीकरण केंद्र हे 12 तास सुरू राहिले पाहिजे. यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी सहा तास ज्येष्ठ नागरिकांसाठी तर सहा तास 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी राखून ठेवावे असंही सांगण्यात आल्याचं टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी बोलताना स्पष्ट केलं.

थोडक्यात बातम्या

“भारतीयांना कोरोना विरोधात लढण्यासाठी बळ मिळू दे”; पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या भारताबद्दल संवेदना

यंदाच्या आयपीएलमधील सर्वात भन्नाट कॅच ; पाहा व्हिडीओ

कोरोना लसींच्या किमती कमी करण्याचे सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश

फक्त याच ठिकाणी 14 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना जाहीर

महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का?; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More