तंत्रज्ञान विधानसभा निवडणूक 2019

टिकटाॅकला गुगल देणार टक्कर; हे अ‌ॅप खरेदी करणार!

 नवी दिल्ली | टिकटॉक या  प्रसिद्ध व्हिडिओ शेअरींग अ‍ॅपची वाढती लोकप्रियता अनेक मोठ्या कंपन्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. परिणामी आता फेसबुकनंतर गुगलही टिकटॉकला टक्कर देण्यासाठी नवं अ‍ॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे.

‘टिकटॉक’ आणि ‘फायरवर्क’ दोन्ही अ‍ॅप्लीकेशनमध्ये बऱ्याच प्रमाणात साम्य आहे. पण, फायरवर्कमध्ये थोडेफार फीचर्स वेगळे आहेत. टिकटॉकमध्ये युजर्स 15 सेकंदांचा व्हिडिओ बनवू शकतात, तर फायरवर्कमध्ये युजर्स 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो. तसंच यामध्ये उभा-आडवा अशा दोन्ही प्रकारे यामध्ये व्हिडिओ शूट करता येतो.

गुगलशिवाय चीनची मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo देखील ‘फायरवर्क’ खरेदी करण्याच्या विचारात आहेत. पण, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीत गुगल इतर कंपन्यांपेक्षा पुढे आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच फायरवर्कने भारतात एन्ट्री केली आहे. तसंच, फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला 100 मिलियन डॉलर नफा प्राप्त झाला आहे.

शॉर्ट व्हिडिओ मेकिंगची वाढलेल्या लोकप्रियतेमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेसबुकनेही lasso नावाचं एक अ‍ॅप लाँच केलं आहे. फेसबुकचं हे अ‍ॅप सध्यातरी केवळ अमेरिकेतच उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या