बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”

सांगली | आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय महापुजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पार पडली. या महापुजेसाठी उद्धव ठाकरे यांनी कार स्वत: आठ तास ड्राईव्हिंग करत पंढरपूरमध्ये ते गेले होते. याचाच धागा पकडत राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अशाच भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालं असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं आहे.

पाच वेळा मा. उच्च न्यायालयाने तंबी देऊनसुद्धा ही योजना अंमलात आणण्यासाठी ठाकरे सरकार आपल्या जबाबदारीपासून टाळाटाळ करत आहे. सामान्य गरीब जनता मेटाकुटीला आली असताना हे प्रस्थापितांचं सरकार गेंड्याची कातडी पांघरून बसलं आहे, अशा शब्दात पडळकरांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. याआधी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही यावरून मुुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

दरम्यान, सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवत असल्याची टीका अतुल भातखकरांनी केली होत.

थोडक्यात बातम्या- 

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एसटीचं कौतुकास्पद पाऊल, आता महिला बस चालवताना दिसणार!

“भारतात कोरोनामुळे 4 लाख नव्हे तर 50 लाख मृत्यू”, या दाव्यानं मोठी खळबळ

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More