मुंबई | आमदार गोपीचंद पडळकर यांनी औंढा नागनाथ येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळ्याच्या अनावरणासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक सविस्तर पत्र लिहिलं आहे.
आहिल्यादेवी होळकर पुतळ्याचं पुढच्या 15 दिवसांमध्ये अनावरण करा, अन्यथा समाजबांधवांच्या हस्ते आम्हीच अनावरण करु, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय.
आहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणापलीकडचं आहे. त्यात किरकोळ श्रेयवादामुळे लोकार्पण थांबवणं हा पुण्यश्लोक आहिल्यादेवींचा अपमान ठरेल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीला पुतळ्याचं अनावरण होणार होतं. मात्र वर्ष उलटूनही पुतळा लोकार्पणापासून वंचितच आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राम मंदिरासाठी मिळालेल्या दानातून भाजपचे नेते दारू ढोसतात’; ‘या’ नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
‘मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही असा अर्थसंकल्प मांडला’; अमृता फडणवीस झाल्या ट्रोल
….तोपर्यंत आमीर खान मोबाईल ठेवणार बंद, आमिरने घेतला मोठा निर्णय!
“डॉ. तात्याराव लहानेंना पद्मश्री मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेतला होता”
“अशोक चव्हाण यांनी स्वत:ला मराठा म्हणून घेऊ नये”