बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल”

नांदेड | देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गोपीचंद पडळकर हे सुद्धा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोड तुरुंगात असतील, असा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे

दरम्यान, पडळकर यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाषसाबणे यांच्या प्रचारार्थ कारेगाव, बळेगाव, करडखेल, मरखेल, टाकळी, धनगरवाडी, क्षीरसमुद्र, बेंबरा, बिजलवाडी, कावळगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

थोडक्यात बातम्या- 

“शाहरुख खानने भाजपत प्रवेश केला तर कोकेन नाही, पीठ सापडलं म्हणून सांगतील”

“देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू”

पाकिस्तान टीम इंडियाला नक्की हरवणार- इम्रान खान

‘…तर आम्हाला थेट मॅसेज करा’; पाकिस्तान टीमसाठी झोमॅटोचं ट्विट

‘या’ तारखेपासून पुन्हा पाऊस बरसणार; शेतकऱ्यांना सतर्कतेचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More