बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘बांधावर जायच्या आधी जयंत पाटील चंद्रावर…’; गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मंगळवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांनी केजमधील अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर परळीमध्ये पाटलांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. त्यावेळी पाटलांनी बोलताना, माझ्या लग्नाची सुद्धा एवढी मोठी वरात कोणी काढली नाही, असं म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे.

जयंत पाटील आधी चंद्रावर होते. मात्र टीका झाल्यानंतर ते पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. त्यासोबतच त्यांनी ट्विटमध्ये पाटलांच्या स्वागतावेळी झालेली गर्दीचे फोटो शेअर केला आहे. परळी, अंबाजोगाई आणि केज तालुक्यात भेटी देऊन त्यांनी पाहणी केली होती.

धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं होतं. अगदी त्याच जल्लोषात काल जयंत पाटील यांचं देखील स्वागत करण्यात आलं होतं. विशेष बाब म्हणजे जोरदार पाऊस सुरू असून देखील गावातील आणि शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर जयंत पाटील काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-  

“गोवा ड्रग्ज माफियांच्या ताब्यात अडकला आहे, तिकडे जाणं गरजेचं”

“शेतकरी उद्धवस्त, उभी पीकं पाण्याखाली, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”

धक्कादायक! ठाण्यातील नर्सने कोरोनाऐवजी दिली रेबिजची लस अन् मग…

हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्रातील ‘या’ 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट!

मरावे परी कीर्तीरूपे उरावे! ब्रेन डेड असूनही मुलाने वाचवले 7 जणांचे प्राण, आरोग्यमंत्रीही अंत्यसंस्काराला हजर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More