गोरखपूर | लोकसभा पोटनिवडणुकीचे आकडे न सांगणं जिल्हाधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी राजीव रौतेला यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय.
गोरखपूरमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फेरीची मतमोजणीची आकडेवारी जाहीर झाली तेव्हा सपा उमेदवार भाजपच्या उमेदवाराला मागे टाकत आघाडी घेतली होती. त्यानंतर दहाव्या फेरीपर्यंत मतमोजणीचे आकडे जाहीर करणं थांबवण्यात आलं होतं.
निवडणूक आयोगाने ही बाब गांभीर्याने घेतलीय. तब्बल साडेतीन तास आकडे जाहीर न केल्यानं याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. दरम्यान, विरोधकांनी या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ घातला.
Comments are closed.