बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर तो दिवस उजाडला; कोरोनाच्या उपचारासाठी ‘या’ औषधाला भारताची परवानगी

कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी जगभर संशोधन चालू आहे. भारतातही विषाणूवरील औषध शोधण्याचं संशोधनकार्य आघाडीवर असल्याचं पहायला मिळतंय. अखेरीस भारतातील एका औषधाला आता कोरोना बाधितांवर उपचारासाठी मान्यता मिळाली आहे. भारतीयांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब म्हणावी लागेल.

भारतातील ‘ग्लॅनमार्क फार्म्युसिटीकल’ औषध निर्माण कंपनीकडून हे औषध बनविण्यात आलंय. कोरोना बाधित रूग्णांवर या औषधाचा उपचारासाठी वापर केला जाईल, असं सरकारकडून नुकतंच स्पष्ट करण्यात आलं. कोरोनाची सौम्य लक्षणं आढळलेल्या रूग्णांना हे औषध देण्यात येणार असल्याचं समोरं आलं आहे.

कोरोना विषाणूवर औषध तयार करण्यासाठी अनेक औषध निर्माण कंपन्यांची चढाओढ सुरूच होती. अखेरीस ग्लॅनमार्क फार्म्युसिटीकल कंपनीनं यात बाजी मारली. कोरोना बाधीत रूग्णांवरील उपचारासाठी आता ‘फेबीफ्ल्यू’ या नावाच्या औषधाच्या वापराला थेट सरकारकडूनच मान्यता मिळाली आहे.

 

कंपनीच्या मते, फेबीफ्ल्यू हे औषध कोरोना संक्रमित रूग्णांना देण्याचा निर्णय सरकारनं घेतला असला तरी, डाॅक्टरांच्या सल्ल्यानेच संबंधीत रूग्णाला हे औषध देण्यात येईल. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडून (CDSCO) फेबीफ्ल्यू औषधाच्या निर्मिती व वितरणासाठी कंपनीला मान्यता देण्यात आली आहे.

ग्लॅनमार्क फार्म्युसिटीकल कंपनीचे चेअरमन ग्लेन सल्दान्हा यांच्या मते, फेबीफ्ल्यू या औषधाची नुकतीच वैद्यकिय चाचणी घेण्यात आली. या नव्या औषधाचा कोरोना बाधित रूग्णांवर पडणारा प्रभाव या चाचणीत तपासण्यात आला. कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांवर हे औषध चांगलच परिणामकारक असल्याचं आढळून आलं.

प्राथमिक माहितीनुसार, फेबीफ्ल्यू या औषधाची किंमत १०३ रूपये असणार आहे. वयवर्ष १८ ते ७५ दरम्यानच्या रूग्णांवरच या औषधाचा वापर करण्यात येणार आहे. सरकार व आरोग्य प्रशासनाच्या समन्वयातून औषधाची निर्मिती व वितरण केलं जाईल, असही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय.

भारतात कोरोना संक्रमितांचा आकडा वेगाने वाढतोय. बाधीत रूग्णांची संख्या ४ लाखांच्यावर पोहचली आहे. या विषाणूने आजमितीस १३ हजारांहून जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. विषाणूवरील या नव्या औषधामुळे आता कोरोनाच्या मृत्यूदरावर बहुतांश नियंत्रण येईल, असा विश्वासही कंपनीकडून वर्तविला जातोय.

Photo: The Week

दरम्यान, कोरोनावर उपचार करण्यासाठी भारतात अनेक औषधांचा वापर केला जात आहे. काही औषधांच्या चाचण्याही अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मात्र कोरोनावर मात करणारी अधिकृत लस अद्याप तयार झालेली नाही. जगभरातील संशोधक यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More