महाराष्ट्र मुंबई

आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प

मुंबई | राज्यातील सर्व सरकारी कामकाज चक्क तीन दिवस ठप्प राहणार आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात राज्यव्यापी संप पुकारला आहे.

7 ऑगस्टपासून हा संप सुरू होणार आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे प्रत्यक्ष लाभ अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आक्रमक होऊन हा संप करणार आहे. सातवा वेतनाकडे सरकार चालढकल करत आहे, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यातील सुमारे दीड लाख अधिकारी संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. सातवा वेतन आयोगाच्या मागणीसह सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण व दमबाजी करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणीही केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर गिरीश महाजन काय म्हणाले!

-आमदार मेधा कुलकर्णीच्या मुलाची मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ!

-मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन!

-ममता बँनर्जी सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!

-आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या