मोठी बातमी! राज्यपालांनी ठाकरे सरकारनं घेतलेला ‘तो’ निर्णय केला रद्द
अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर 2021 ला आग लागली होती. जिल्हा रूग्णालयात भीषण आग लागल्यानं अकरा रूग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारनं जिल्हा चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांच्यासह इतर तिघांना निलंबीत केलं होत तर, दोन नर्सची सेवा समाप्त केली होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात झालेल्या अग्निंकांड प्रकरणात राज्य सरकारनं जिल्हा शल्य चिकित्सकांचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. डॉक्टर सुनिल पोखरणा यांना पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसे आदेश देखील काढण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अतिदक्षता विभागाला आग लागल्यानं या दुर्घटनेत अकरा रूग्णांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले होते. राज्यसरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून राज्य शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई केली होती. तर तोफखाना पोलीस ठाण्यात या प्रकरणी तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, या घटनेत मृत्यू झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून 5 लाख रूपये व राज्य आपत्ती निधीमधून 2 लाख अशी 7 लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 11 जणांपैकी मृत्यू झालेल्या एका रूग्णाच्या नातेवाईकास प्रतिनिधीक स्वरूपात दोन लाख रूपयांचा धनादेश तत्काळ वितरित करण्यात आला होता.
थोडक्यात बातम्या-
“इतकं क्रूर पद्धतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं”
Shocking: स्वप्नात दिसलं असं काही की दुसऱ्याच दिवशी तीनं केलं बाॅयफ्रेंडसोबत ब्रेकअप
Corona Update: कोरोनाबाबत WHOनं दिला गंभीर इशारा, म्हणाले…
31 मार्चच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा फटका
मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.