बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“12 सदस्यांची नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी वाढदिवसानिमित्त राज्याला गोड भेट द्यावी”

मुंबई | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशातच शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा, असं लिहिलं आहे.

तसेच गेल्या आठ महिन्यांपासून विधान परिषदेतील सदस्यांच्या नियुक्तीचा मुद्दा राज्यपालांनी रखडून ठेवला आहे. यावरून संजय राऊत यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत राज्यपालांकडे एक मागणी केली आहे. संजय राऊत यांनी राज्यपालांकडे विधानपरिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून मा.राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी, असं म्हटलं आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या मागणीवर राज्यपाल काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तसेच आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण; पाहा आजचा दर?

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

…तर महाराष्ट्रात चमत्कार होईल- संजय राऊत

मोठी बातमी! एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

“मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा नाही झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More