बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच…
पाटणा | चारा घोटाळा प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही सीबीआयच्या कारवाईच्या कचाट्यात सापडलीये आहे.
सीबीआयने लालू आणि त्यांच्या मुलीवर त्यांच्या कार्यकाळात भरतीमध्ये कथित अनियमितता केल्याप्रकरणी नवीन गुन्हा दाखल केला आहे.या भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई करत सीबीआयचे पथक लालूंच्या पाटणा येथील निवासस्थानासह 15 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकत आहे.
चारा घोटाळ्यातील डोरंडा कोषागारातून अवैध पैसे काढल्याच्या प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना गेल्या महिन्यात 22 तारखेला जामीन मंजूर केला आहे.
जामीन मिळाल्यानंतर त्यांनी काही दिवस एम्समध्ये उपचार घेतले, त्यानंतर ते त्यांची मोठी मुलगी मीसा भारतीच्या घरी आहेत. सुनावणीपूर्वीच प्रकृती खालावल्याने लालूंना एअर अॅम्ब्युलन्सने दिल्ली एम्समध्ये आणण्यात आल्याची माहिती आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! संभाजीराजेंसाठी शिवसेना खेळी करण्याची शक्यता!
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत मोठी अपडेट समोर!
मोठी बातमी! काँग्रेसला जोर का झटका; 50 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेल्या नेत्याचा भाजपत प्रवेश
“महाविकास आघाडीचं सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा”
Comments are closed.