वाढत्या हिंसक हल्ल्यांमुळे यूपी-बिहारींचं गुजरातमधून पलायन; 342 जणांना अटक

अहमदाबाद | गुजरातमध्ये परप्रांतियांविरोधातील आंदोलनाने मोठा पेट घेतला आहे. परप्रांतियांविरोधात मोठ्या प्रमाणात हल्ले होत असल्यानं यूपी-बिहारींनी गुजरातमधून पळ काढला आहे. 

गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी मूळचा बिहारी आहे. त्यानंतर उत्तर भारतीय नागरिकांविरोधात गुजरातमध्ये आंदोलन उभं राहिलं आहे. 

गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटण, साबरकाठा, अहमदाबाद या जिल्ह्यांमध्ये उत्तर भारतीयांवर हिंसक हल्ले होत आहे. पोलिसांनी अशा कामगार वस्त्यांना संरक्षणसुद्धा दिलं आहे. 

दरम्यान, उत्तर भारतीयांवर हल्ले करणाऱ्या तसेच सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट लिहिणाऱ्या 342 जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-फिटनेससाठी कायपण! विराट कोहलीनं या आवडत्या गोष्टींचा केला त्याग!!!

-युती तुटली तर आमच्यापेक्षा शिवसेनेला मोठा फटका बसेल- मुख्यमंत्री

-पतंग उडवण्याच्या मांजामुळे 26 वर्षीय डॉक्टरचा गळा चिरून मृत्यू

-मीच असणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

-दर कपात केल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा