महाराष्ट्र मुंबई

“सरकारच्या निर्णयामुळे एक दिवसाचा शासनाचा खर्च वाचला, उगाच बोंबाबोंब करू नये”

Loading...

मुंबई | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यानंतर अनेक स्तरातून टीका करण्यात येत आहेत. यावर मंत्री बच्चू कडू यांनी घेतलेल्या आक्षेपावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

सरकारने 5 दिवसांचा आठवडा केला असला तरी त्याचसोबत कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत वाढ केली आहे. 45 मिनिटे प्रतिदिन वाढवण्यात आली आहे. कर्मचारी त्यांचे काम करतील. पण बच्चू कडू यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मुल्यमापन करायचं झालं तर ते करणार कसं? असा प्रतिसवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

Loading...

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत मोठी बचत होणार आहे. प्रशासकीय कार्यालयातील एक दिवसाचा खर्च वाचणार आहे त्यामुळे उगाच बोंबाबोंब करू नये. यामध्ये वीज बिल, पाणी बिल, वाहनातील इंधन खर्च असं कोट्यवधी रुपये वाचणार आहेत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा असल्याचं निरूपम यांनी म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर पवार साहेबांना आठवा- रोहित पवार

शिवरायांचा पुतळा हटवला तिथंच आता स्मारक; मुख्यमंत्री कमलनाथ करणार भूमिपूजन

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

सिलेंडर घेऊन बसलेल्या स्मृती इराणींचा फोटो ट्विट करत राहुल गांधी म्हणाले…

पुण्यात थांबून राज ठाकरेंनी घेतला ‘या’ व्यक्तीचा सल्ला!

आमदार सुनील टिंगरेंच्या नावानं मागितली जातेय खंडणी; टिंगरे, म्हणे तो मी नव्हेच!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या