भाजपकडे माझी बनावट सेक्स सीडी, पाहा आणि आनंद घ्या!

अहमदाबाद | माझी बदनामी करण्यासाठी भाजपनं माझी बनावट सेक्स सीडी तयार केलीय, असा खळबळजनक आरोप पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यानं केलाय.

माझी सेक्स सीडी तयार करून मतदानाआधीच ती प्रसिद्ध केली जाईल. भाजपकडून आणखी काय अपेक्षा करू शकतो, त्यामुळे पाहा आणि केवळ आनंद घ्या, असंही तो म्हणाला.

गुजरात राज्यात प्रचाराचा जोर धरू लागलाय. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हार्दिकनं भाजपवर असे आरोप करून एकच खळबळ उडवून दिलीय.