महाराष्ट्र मुंबई

मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या सरकारसोबत मी जाईन- हर्षवर्धन जाधव

मुंबई | जे सरकार मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल, मी निवणून आल्यानंतर त्यांच्यासोबत जाईन, असं वक्तव्य औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केलं आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. यावेळी त्यांना भेटायला आल्यानंतर जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. प्रवेशासंबंधी राज्य सरकार अंतिम निर्णय घेऊ शकते, असं ते म्हणाले आहेत.

राज्य सरकार अध्यादेश काढून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ शकते, पण सरकारमध्ये राजकीय इच्छा शक्ती नाही, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-ईव्हीएमबाबत शंका नाही; अजित पवारांचा शरद पवारांना घरचा आहेर

-राहुल गांधींमुळे सलूनवाल्याची उधारी झाली बंंद!

-पोस्टर बॉईज; धोनीच्या कट्टर समर्थकांचा मुंबई इंडियन्समध्ये जाहीर प्रवेश!

-रोहित शर्मा माझी बायको आहे का, त्याला नेहमी नेहमी बोलायला- शिखर धवन

-…म्हणून बंगालमध्ये माझ्या रॅलीवर हल्ला करण्यात आला- अमित शहा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या