बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“चंद्रकांतदादांची सगळी ‘माया’ कुठंय हे मला माहिती आहे”

कोल्हापूर | हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याला हसन मुश्रीफ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगवेगळे तीन अब्रूनुकसानीचे दावे केले आहेत. चंद्रकांतदादा पाटील मला विकावं लागेल असं म्हणत असले तरी त्यांची माया कुठं आहे मला माहिती आहे, असा टोला हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

नितीन गडकरी यांनी भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात. मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्याला घाबरत नाही. पण माझी सर्व प्रॉपर्टी विकली तर 100 कोटी काय 1 कोटीही मिळणार नाहीत. त्यामुळे हा खटला हसन मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावं लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवस लॉकडाउन वाढवला

‘तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल’; एकतर्फी प्रेमातून युवकाची तरूणीकडे शरीरसुखाची मागणी

‘आजी वारल्याचं का सांगितलं नाही?’; तरुणाला दोघा आत्तेभावांकडून जबर मारहाण

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमधील या खेळाडूच्या वडिलांचं कोरोनाने निधन 

“सुप्रीम कोर्टाला टास्क फोर्स नेमावी लागते, मग केंद्र सरकार काय करतंय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More