Top News अहमदनगर महाराष्ट्र

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

अहमदनगर | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी याआधी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही आता आपल्याच पोलिसांवर संशय घेत आहेत. हे दुर्दैव आहे, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. अहमदनगरला ध्वजारोहणाचा कार्यक्रम समारंभ मुश्रीफांच्या हस्ते पार पडला यावेळेस बोलताना त्यांनी फडणवीसांना चांगलच फटकारलं आहे.

मुश्रीफ म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांकडून सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. फडणवीसांनी मागणी केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांच्यावर बिहार निवडणूकीची जबाबदारी केंद्राकडून सोपविण्यात आली आहे. यातून हा राजकारणाचा भाग असल्याचं आपल्या सहज लक्षात येईल.

तसेच पाच वर्षांच्या कार्यकाळात फडणवीसांनी स्वतः गृहखात्याचा कारभार सांभाळला आहे. मात्र सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात हेच फडणवीस आता राज्य पोलिसांवर अविश्वास ठेवत आहेत, असा टोला मुश्रीफांनी लगावला आहे. मुश्रीफांच्या खांद्यावर अहमदनगर जिल्ह्याची पालकमंत्र्याची धुरा असल्यानं यावेळेस बोलताना जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे.

जिल्ह्यात कोरोनाचं आव्हान अद्याप कायम आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मृत्यूदर कमी करणे, कोविड रूग्णांना बेडची सोय व्यवस्था करून देणे, योग्य उपचार देणे या गोष्टी प्राधान्यानं करणं गरजेचं असल्याचं मतंही मुश्रीफांनी यावेळेस व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आपके राज्य में बिना आपके परमिशन आ गये”

“शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार” स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्याचा निर्धार!

जे दिसतात ते सोबत नसतात, जे सोबत असतात ते दिसत नाहीत- उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

स्वातंत्र्यदिनाला गालबोट; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतलं अन्…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या