बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचा कहर! आणखी एक नवा व्हेरिएंट आला समोर

बंगळुरु | जगभरात कोरोनानं खळबळ माजवली आहे. कोरोनाच्या बदलत्या रुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरं जावं लागू शकतं असं बोललं जात आहे. यातच आता कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर आणखी एक व्हायरस समोर आला आहे. या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण सापडल्यानं सगळीकडे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’नं धुमाकूळ घातलेला असतानाच आता एटा कोरोना व्हेरिएंट सापडला आहे. कर्नाटकच्या बंगळुरुत एटाचा पहिला रुग्ण आढळला आहे. या व्हेरिएंटबाबत शोध सुरु असून हा व्हेरिएंट आजही इओटा, कप्पा आणि लॅम्ब्डासारखा व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट आहे. 

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एटा व्हेरिएंटची ही पहिला घटना नसून यापहिलंही एप्रिल 2020 मध्ये राज्यात एटा व्हेरिएंटचा रुग्ण सापडला होता, असं राज्याचे नोड अधिकारी आणि कोरोना होल जीनोम सीक्वेंसिंग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. रवी यांनी सांगितलं.

दरम्यान, एटामुळे तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या व्हेरिएंटच्या संसर्गावर संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचं काही तज्ज्ञांनी म्हटलं. कोरोना विषाणूच्या नवनवीन व्हेरिएंटमुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

“जाऊ तिथं खाऊ असं महाविकास आघाडी सरकारचं काम”

नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, कौतुक करत फोन ठेवताना म्हणाले…

दिलासादायक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा घटला, वाचा आकडेवारी

‘मोटा सरपंच’ म्हणून हिणवलं जाणाऱ्या नीरजने करोडो भारतीयांचं स्वप्न केलं साकार; नीरजची रंजक कहाणी!

भारताची सुवर्णयुगाला सुरूवात, नीरज चोप्राचं कौतुक करायला शब्द नाहीत- अजित पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More