महाराष्ट्र मुंबई

संकटाच्या काळात असंवेदनशीलता दाखवू नका; आरोग्यमंत्र्यांचं खासगी डॉक्टरांना आवाहन

Loading...

मुंबई | संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केलं आहे.

अनेक ठिकाणी अनेक रुग्णालयं भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं? असा सवाल टोपे यांनी केला.

Loading...

कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. कोरोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी जावं कोणाकडे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 15 वर पोहोचल आहे. तर दुसरीकडे ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांचा आजार बराही झाला आहे. कोरोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

ट्रेंडिंग बातम्या-

लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवार म्हणाले…

सर्व कर्जाचे हफ्ते 3 महिने स्थगित; आरबीआयचा मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!

सरकारने पीक कर्जाचे पुढचे 4 ते 5 वर्षसाठी हप्ते पाडून द्यावेत- शरद पवार

‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या