बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ह्रदयद्रावक! शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडत होता, गाडीतून व्यक्ती उतरला अन्…, पाहा व्हिडीओ

लखनऊ | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडीओ समोर येत असून एका व्हिडीओने सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवला आहे.

या व्हिडीओमध्ये एक शेतकरी गाडीच्या चाकाजवळ तडफडताना दिसत आहे. गाडीतून एक व्यक्ती खाली उतरतो आणि पुढे धाव घेतो. मात्र व्यक्तीच्या पायाशेजारी असलेल्या शेतकऱ्याकडे कोणीही लक्ष देत नाही. शेतकऱ्यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर या हिंसाचाराचा आरोप केला आहे. तर मिश्रांनी हा आरोप नाकारत आपण दुसऱ्या कार्यक्रमाला असल्याचं म्हटलं आहे.

लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारानंतर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आला आहे. एवढंच नाही तर राजकीय नेत्यांना देखील तिथं जाण्यास मनाई केली आहे. हा व्हिडीओ NSUI च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. तसेच केंद्रीय गृह राज्यमंत्रींच्या गाडीतून उतरलेला व्यक्ती कोण?, असा सवाल या व्हिडीओवरुन करण्यात आला आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलकांच्या जमावात गाड्या घुसवल्याने मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यानंतर काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना पोलिसांनी लखीमपूरला जाण्यापासून अडवलं. यावरूनही राजकीय वातावरणात गरमा गरमी दिसली.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! 36 तासांच्या नजरकैदेनंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींना अटक

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

“जो अख्ख जहाज खरेदी करु शकतो त्याला ड्रग्ज विकायची काय गरज?”

‘ही घटना तर जालियनवाला बागची पुनरावृत्ती’; लखीमपूर घटनेवरून शरद पवारांचा हल्लाबोल

शाहरुखच्या मुलाआधी ‘या’ दिग्गज अभिनेत्याच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झाली होती अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More