बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हृदयद्रावक! माहेरचा निरोप घेणाऱ्या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घेतला जगाचा निरोप

बिहार | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत आहे. देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशातच गृहप्रवेशाआधीच नवरीचा मृत्यू झाल्याची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

बिहारच्या नालंदामधील सोहसराय ठाण्याच्या हद्दीतील बंधू बाजार परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बिहारच्या नवादा परिसरातील रहिवासी गोपाल पंडित यांची मुलगी आरती हीचं लग्न हे सोहसराय बंधु बाजारमधील मनोज पंडित यांचा मुलगा विकासबरोबर झालं. रात्री विवाह झाला आणि त्यानंतर सकाळी नवरी सासरी पोहोचली. अचानक नवरीची तब्येत बिघडल्यानं घाई घाईत नातेवाईक तिला घेऊन रुग्णालयात गेले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. काही तासांपूर्वी ज्या लेकीला सासरी जाण्यासाठी निरोप दिला तिला असा कायमचा निरोप द्यावा लागल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

नवरीचा अचानक मृत्यू झाल्यानं आणि कोरोनाच्या भीतीमुळं कुटुंबातील सर्वजन घाबरुन गेले होते. मात्र नवरीचा कोरोना रिपोर्टही निगेटीव्ह आला आहे.

दरम्यान, नवरीच्या भावानं सांगितलं की, नवरीचं लग्नाच्या दिवशी पोट दुखत होतं. तिला उलटी देखील झाली होती. मात्र लग्नाच्या घाईत याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. मात्र सासरी पोहोचताच नवरीची तब्येत खालावली. नव्या नवरीच्या मृत्यूने तिच्या माहेरच्या आणि सासरच्या अशा दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; जाणून घ्या

धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून आईने केली पोटच्या पोराची हत्या

धक्कादायक! अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर चाकूने हल्ला

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लुकने चाहते घायाळ, पाहा फोटो

कौतुकास्पद! कोरोनायोद्ध्यांना गरम होऊ नये म्हणून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बनवलं अनोखं ‘कुल पीपीई किट’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More