नवी दिल्ली | मार्च महिना उजाडला असला तरी काही राज्यांवर अजूनही पावसाचं संकट कायम आहे. पुढचे पाच दिवस भारतीय समुद्रात वेगवान वारे वाहणार आहेत. त्यामुळे काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
पश्चिमी वाऱ्यामुळे विविध ठिकाणी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि गल्फ ऑफ मन्नारच्या परिसरात वेगवान वारे वाहत आहेत. तामिळनाडू, पुड्डुचेरी, कराईकल परिसरात 4 व 5 मार्च रोजी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
रायलसीमा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारी भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. देशातील अनेक भागात पावसाची शक्यता असताना महाराष्ट्रात मात्र पुढचे पाच दिवस पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.
दरम्यान, पुढचे पाचही दिवस महाराष्ट्रात कोरडं हवामान असणार आहे. तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता असली तरी पावसाचा इशारा मात्र देण्यात आलेला नाही. महाराष्ट्रात वातावरण कोरडं असलं तरी उत्तर भारतात पुन्हा एकदा पश्चिमी वाऱ्यांमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…
“…पण ज्यांना मुल बाळ नाही त्यांना काय कळणार”
“अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे, पायात पाय अडकून पडेल”
उदयनराजेंचा हटके अंदाज! हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग; पाहा व्हिडीओ
महाशिवरात्रीला भांगचा हँगओव्हर झालाय? मग करा ‘हे’ 6 घरगुती उपाय
Comments are closed.