Top News

रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्ण दगावल्यास कुटुंबीयांना भरपाई द्या- उच्च न्यायालय

मुंबई | रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यास राज्य सरकार बांधील आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलंय.

सायन रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृतदेह वॉर्डमध्येच ठेवून अन्य कोरोना रुग्णांवर तिथेच उपचार करण्यात आले होते. याची दखल घेत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासंबंधी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणीत मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदवलं.

ज्या कोरोना रुग्णांचा दुर्लक्षपणामुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा नेमावी. हे त्यांचे कर्तव्य आहे. आम्ही केवळ सरकारला जागं करत आहोत, असं न्यायालयाने म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-

‘मी जिवंत आहे’; जिवंतपणी श्रद्धांजली वाहणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली

मी अंधभक्त नाही, गरीब कुटुंबातील व्यक्ती पंतप्रधान बनू शकते हे मोदींनी सिद्ध केलं- कन्हैया कुमार

“राहुल गांधी व्हीआयपी शेतकरी, जे ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी सोफा वापरतात”

…म्हणून काँग्रेसचा कृषी विधेयकाला विरोध- रावसाहेब दानवे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या