बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 2 मॉडेल्सची सुटका

मुंबई | मुंबईतील ग्रांड रोड परिसरात एका थ्री स्टार हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. यानंतर मुंबई पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका दलाल महिलेला अटक केली आहे. तर दोन तरुणींची सुटका केली आहे.

ग्रांड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये देहविक्री सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून दलाल महिलेला रंगेहाथ पकडले. या पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली आहे.

या दोन्ही तरुणींचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पण शासकीय नियम धाब्यावर बसून हॉटेल्समध्ये अवैध धंदे सुरूच आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडलेल्या बॉलिवूडच्या एका फोटोग्राफरने सेक्स रॅकेट सुरु केलं होतं. नासिर खान याने करण ठाकूर अशा खोट्या नावाने वेश्याव्यवसाय सुरु केला. मात्र मुंबई क्राईम ब्रांचने हे रॅकेट उद्ध्वस्त करत त्याला अटक केली.

थोडक्यात बातम्या- 

‘लसीचा शस्त्र म्हणून नाही तर, वैयक्तीक प्रचारासाठी वापर’; प्रियंका गांधींचा मोदींवर हल्लाबोल

अखेर कोरोनावर प्रभावी उपचार सापडला; दोन दिवसात कोरोना रूग्ण घरी

तरुण सरपंचाने करुन दाखवलं, काहीच दिवसांत गाव कोरोनामुक्त, पण पॅटर्न काय वापरला पाहा…!

वादग्रस्त पु्स्तकावरून लेखक गिरीश कुबेर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

PNB बँक घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More