बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या 57 शूर पोलिसांना पदक जाहीर

नवी दिल्ली | केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी देखील गृह मंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील 57 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, 13 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत .

एकूण 946 पोलीस पदक जाहीर झाली असून 89 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, 205 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक आणि 650 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत.

देशातील 89 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या-

टाटांची बहुचर्चित सफारी 26 जानेवारीला लाँच होणार; जाणून घ्या वैशिष्ट्यं

पोटच्या मुलींची हत्या केली; म्हणाले, सकाळी पुन्हा जिवंत होणार!

न्यायालयाच्या ‘त्या’ निर्णयावर रितेश देशमुखची उघड उघड नाराजी; म्हणाला…

…अन् ‘आयर्नमॅन’ कृष्णप्रकाश यांनाही अश्रू आवरता आले नाहीत, पाहा व्हिडीओ-

6 महिन्यांपूर्वीच दिले होते संकेत; अभिनेत्रीच्या आत्महत्येनं सिनेविश्वात खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More