बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सोमय्यांच्या कारवाईशी मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही’; दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई | राजकीय वर्तुळात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षांविरूद्ध अधिक आक्रमक झालेले पहायला मिळत आहेत. नुकतेच सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. यानंतर सोमवारी सोमय्या रेल्वेने कोल्हापूरला जात असताना त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्यांना कराडमध्ये खाली उतरवण्यात आलं होतं. या सर्व प्रकारात शिवसेनेने आपले हात झटकले होते.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काहीही संबंध नसल्याचं वारंवार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने नाही तर गृहमंत्रालयाने ही कारवाई केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यानंतर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे.

सोमय्यांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांना माहित आहे की नाही हे माहित नाही. परंतु कालच्या घटनेचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही. कारवाईचा जो काही निर्णय आहे तो गृहमंत्रालयाने घेतला आहे ही वस्तुस्थिती आहे, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

तसेच साधारणपणे अशी घटना घडते त्यावेळी वरिष्ठ अधिकारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ब्रिफींग करत असतात. परंतु या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांना ब्रिफींग करण्यात आलं की नाही हे मला माहित नाही, असं देखील वळसे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘आम्ही चौकशी केली, त्यात कोणताही घोटाळा झालाच नाही’; देवेंद्र फडणवीसांनी आरोप फेटाळले

“आमचा विश्वासघात झालाय, ‘ते’ मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत”

राज्यात पुढील 3 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; ‘या’ भागांना अलर्ट जारी

चांगलं केलं की चांगलंच होतं, आता वेळच सर्व गोष्टींना उत्तर देईन – सोनू सूद

विराटची लाडकी कार विक्रीसाठी बाजारात, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More