स्मार्टफोनमध्ये डॉक्युमेंटवर डिजिटल स्वाक्षरी कशी कराल?; वाचा संपूर्ण प्रकिया
दिल्ली | आजच्या ऑनलाईन युगात घरात बसूनही अनेक शासकीय कामे, ऑफिसमधील कामे स्मार्टफोनमध्ये करु शकतो. अॅपच्या मदतीनं कोणतीही पीडीएफ फाइल ई-साइन करू शकतो. डिजिटल जगात अनेक गोष्टी डिजिटल झाल्यामुळे लोकांना कामात खूप सहजता मिळाली. गुगल प्ले स्टोअरवरून अॅड्रॉइड फोनमध्ये अॅप मोफत उपलब्ध होतात.
जगात अनेक गोष्टी डिजिटल झाल्यामुळे कामात खूप सहजता आली आहे. डिजिटल जगात अनेक गोष्टी अतिशय सोप्या आणि प्रगत होत गेल्या व सोबतच वेळ आणि पैशाचीही बचत झाली आहे. कार्यालयात न जाता घरी बसूनही अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. कागदपत्रे मिळवण्यासाठीही फार दूर जाण्याची गरज भासत नाही.
दरम्यान, मोबाईलमधूनही तुम्ही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करु शकता. मात्र ही स्वाक्षरी कशी करावी असा प्रश्न खूप लोकांना पडतो. यासाठी साधी प्रक्रिया असून त्याबाबत जाणून घेऊया.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये Adobe Acrobat Reader अॅप डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल.
- लॉग इन करा आणि तुम्ही नवीन वापरकर्ते असाल तर नवीन खाते तयार करा.
- फाइल आयकॉनवर टॅब करा, जे स्क्रीनवर उपस्थित असेल.
- पीडीएफ डॉक्युमेंट निवडा त्यामध्ये तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे. याशिवाय तुम्ही Google Drive, One Drive आणि Dropbox वरून फाईल्स अटॅच करू शकता.
- तुम्हाला कुठे व कोणत्या फाईलवर सही करायची, त्यावर एकदा टॅब करा.
- नंतर, उजव्या कोपऱ्यात असलेल्या एडिट चिन्हावर क्लिक करा.
त्यानंतर fill and sign या पर्यायावर क्लिक करा. - डावीकडे दिलेल्या स्वाक्षरी चिन्हावर क्लिक करा आणि डिजिटल स्वाक्षरी तयार करा.
नंतर बॉक्समध्ये ई-स्वाक्षरी करा. - स्वाक्षरी लहान किंवा मोठी करू शकता आणि गरजेनुसार कुठेही लावू शकता.
फाईल पूर्ण झाल्यावर एकदा दिलेला चेक मार्क तपासून घ्या.
थोडक्यात बातम्या –
Breaking| 10 वी 12 वीच्या परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला होणार परीक्षा
“आम्ही पीत नाही त्यामुळे वाईन आणि दारुतला फरक शरद पवारांनी समजून सांगावा”
निळू फुले यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर, मुलीनं केला खुलासा
Digital Currency म्हणजे काय आहे?; वाचा सविस्तर
अभिजित बिचुकलेचा थेट मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाला…
Comments are closed.