मनोरंजन

‘हा’ अभिनेता वयाच्या 45व्या वर्षी ठरला आशियातील सर्वात सेक्सी पुरुष

मुंबई | लाखो तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. आज 10 जानेवारी रोजी हृतिकचा 45वा वाढदिवस आहे.  काही दिवसांपूर्वी हृतिकने आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019 च्या यादीमध्ये स्थान पटकावलं आहे.

ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वाधिक मते मिळाली. गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळवत हृतिकने आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019चा मान मिळवला आहे.

सर्वप्रथम मला मत दिलेल्यांचे मनापासून आभार. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचं दिसणं माझ्यासाठी महत्त्वाचं नसतं, असं हृतिक रोशनने म्हटलं आहे.

दरम्यान, मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरुन परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवलं आहे त्याचा जीवन प्रवास कसा होता आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हे मी पाहतो, असं हृतिक म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या