Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यपालांवर ओढवली नामुष्की; फडणवीस म्हणातात, “इगोवालं सरकार!”

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. गेल्या काही वर्षात दोन्हीकडून वादाचे अनेक अंक रंगलेले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहेत. आताही राज्यपालांच्या विमान प्रवासावरुन दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. उत्तराखंड दौऱ्यावर निघालेल्या राज्यपालांच्या विमानाला परवानगी न मिळाल्याने राज्यपालांवर पुन्हा राजभवनात परतण्याची नामुष्की ओढवली होती. या मुद्द्यावरुन भाजपने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार लक्ष्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवास नाकारण्याचा जो प्रकार झाला आहे तो दुर्देवी आहे. ही काही कुणाची खासगी मालमत्ता नाही. राज्यपाल या राज्याचे प्रमुख आहेत. तेच मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची नेमणूक करत असतात. राज्यपाल हे संविधानिक पद आहे, आपण कुणाचा अपमान करतोय हे सरकारला कळायला हवं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यपालांना कुठेही जायचं असेल तर ते राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहितात. त्यानंतर तो विभाग त्यासंदर्भात आदेश काढतो. मी माहिती घेतली असता तसा आदेश त्यांनी काढला होता. ते पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यासंदर्भात परवानगी देण्यात आली नाही. महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात मी इतका इगो असलेलं सरकार पाहिलं नाही, असंही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा उत्तराखंडला नियोजित कार्यक्रम होता. मसुरी येथे आयएएस अकादमीच्या सांगता समारंभाला त्यांना उपस्थित रहायचं होतं. मात्र विमानात गेल्यानंतर उड्डाण करण्यासाठी परवानगी नसल्यानं त्यांना पुन्हा राजभवनावर परतावं लागलं होतं. त्यानंतर खासगी विमानाने ते या कार्यक्रमासाठी रवाना झाले. मात्र आगामी काळात या मुद्द्यावरुन राज्याच्या राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

राज्यपाल काही फक्त भाजपचे नाहीत ते महाराष्ट्राचेही आहेत- संजय राऊत

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसलेंवर ‘ED’ची धडक कारवाई, मुलाला मुंबईला नेलं!

परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मंत्री कोण?; देवेंद्र फडणवीस म्हणतात…

“…म्हणून त्यांनी अमित शहांना बोलवून शिवसेनेला संपवण्याची सुपारी दिली”

हिंदी चिनी पुन्हा भाई-भाई!; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची संसदेत मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या