बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाॅवर कट बत्ती गुल ; महावितरणाच्या कारवाईनं शेकडो गावं अंधारात

रायगड | प्रशासनात समन्वयाचा अभाव नसेल तर प्रकरण किती मोठं होऊ शकतं काही सांगता येत नाही. असाच एक प्रकार रायगड जिल्हात घडला आहे. महावितरणाने रायगड जिल्हात धडक करवाई करत पाॅवर कट मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे रात्री गावोगावात नुसता काळोख पसरलेला दिसून येत आहे. महावितरणाने या कारवाईत तब्बल 1 हजार 90 स्ट्रीट लाईट मीटरचे वीज कनेक्शन कापले आहे.

अनेक ग्रामपंचायतींनी 3 वर्ष विज बील भरलेच नाही. 816 ग्रामपंचायतींची एकूण 149 कोटी रूपये थकबाकी शिल्लक आहे त्यामुळे महावितरणाकडून ही कारवाई करण्यात आली. अलिबाग, पनवेल ग्रामीण, रोहा आणि गोरेगाव या विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडीत केल्यानं याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर देखील झाला आहे.

रायगडच्या 2 हजार 754 स्ट्रीट लाईटपैकी 1 हजार 90 मीटरचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. तर 702 पाणी पुरवठा योजनांपैकी 96 योजनांचा वीज पुरवठा कापण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्हात वीजे बरोेबर पाण्याचा समस्येलाही सामान्य नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे.

दरम्यान, 2018 पर्यंत स्ट्रीट लाईटचे वीज बिल राज्य सरकार भरत होतं. परंतू फडणवीस सरकारच्या काळात एप्रिल 2018 पासून वीज बिल ग्रामपंचायतीनी भरावा असा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र त्यानंतर अनेक ग्रामपंचायतींनी तेव्हापासून वीज बिल भरलं नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. थकीत वीज बिल भरून ग्रामपंचायतीनं सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणानं केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

आमचाही राजकीय पक्ष आहे, आम्ही काही गोट्या खेळत नाही – इम्तियाज जलील

थकित वीजबिल असणाऱ्यांची वीज तोडू नका, अन्यथा…- उदयनराजे भोसले

ईडीची मोठी कारवाई! सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त

रघुराम राजन यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…

10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून तुम्हीही सुन्न व्हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More