Top News क्राईम नागपूर महाराष्ट्र

तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!

नागपूर | नागपूरच्या MIDC भागात अनैतिक संबंधातून पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सारिका कनोजिया असं या महिलेचं नाव आहे. तीने आपला प्रियकर पंकज कडू याच्यासोबत मिळून पती शेखर कनोजिया याची हत्या केली.

MIDC भागातील दंतेश्वरमध्ये राहणारे कनोजिया दांपत्य कपडे इस्त्री करण्याचे काम करायचे. त्यांना दोन मुली असून एकीचे लग्न झाले असून दुसरीचा काही दिवसांपूर्वीच अपघाती मृत्यू झाला आहे. यामुळे शेखर कनोजिया यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती.

दुसरीकडे वस्तीतच राहणारा पंकज आणि सारिका यांची कामानिमित्त भेट होत होती. त्यातूनच दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते. शेखरच्या गैरहजेरीत त्यांच्या भेटीगाठी होत होत्या, अखेर हे प्रकरण शेखरला कळताच त्यांच्या खटके उडू लागले. त्यानंतर शेखरने पंकजला घरी येण्यास मनाई केली, मात्र असं असलं तरी दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते.

7 फेब्रुवारीला पती शेखर घरी आला, तेव्हा पंकज आपल्याच घरात असल्याचे शेखरला दिसले, यातून तिघांमध्येही कडाक्याचे भांडण झाले. याच भांडणात सारिका आणि पंकजने मिळून पंकजचं डोकं भिंतीला आपटून त्याची हत्या केली. अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या शेखरचा दोघांनी काटा काढला होता, मात्र पोलिसांना या घटनेची कुणकुण लागली. दोन्ही आरोपींनी यामुळे पोबारा केला, मात्र शुक्रवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक अपघात, …अन् कार थेट विहिरीत कोसळली!

‘पोलिसांनी पूजा चव्हाणची ती गोष्ट तपासावी, बऱ्याच गोष्टी बाहेर येतील’; भाजपच्या नेत्याच्या गौप्यस्फोट

…ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट- चंद्रकांत पाटील

पुन्हा लॉकडाऊनबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तृप्ती देसाई आक्रमक, सरकारवर केला ‘हा’ गंभीर आरोप

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या