बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वाहन चालवण्याची हौस महागात; मुलाचा मृत्यू आणि आईवर गुन्हा दाखल

हैदराबाद । सध्याच्या अल्पवयीन मुलांना वाहनचालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसेन्स मिळण्यापूर्वी वाहन चालवण्याची खूप उत्सुकता असते. वाहतुकीचे नियम कितीही कडक असले तरी या मुलांना गाड्या घेउन रस्त्यावर जाण्याची आणि योग्य मार्गदर्शनाशिवाय गाडी चालवाण्याची हौस असते. अशावेळी आपल्या मुलांना वाहतुकीचे नियम समजवणे ही जबाबदारी पालकांची असते. हे नियम न पाळल्यास आपल्या मुलाच्या तसेच रस्त्यावरील अनेक लोकांच्या जीवाला धोका असू शकतो.

अशीच एक घटना हैदराबादमध्ये घडली आहे… 19 वर्षीय जी. योगेश सागर याचा गेल्या महिन्यात 23 फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या स्कूटरला कॉक्रिंट मिक्सर ट्रकने धडक दिली आणि त्याच अपघातात त्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधल्या गच्चीबावली परिसरातल्या मस्जिदबांदा इथे हा अपघात घडला होता. त्यात दुर्दैव असं की त्या मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. त्यामुळे त्याची आई डी. गीता राणी यांनी लायसेन्स नसताना मुलाला गाडी दिल्याबद्दल पोलिसांनी तिच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

योगेश सागर 19 वर्षांचा होता, त्याला गाडी चालवण्याची मोठी हौस होती, मात्र लायसन्स न काढता गाडी चालवण्यास परवानगी न देणे ही पालकांची जबाबदारी असते. योगेशला लायसन्स काढल्याशिवाय गाडी चालवण्याची परवानगी दिल्यामुळे त्याच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे.

ट्रक ड्रायव्हर डी. भुमैया याच्यावरही पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच ट्रकचा मालक कमलाकर रेड्डी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हरला गच्चीबावली पोलिसांनी अटकही केली आहे.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणात समोर आला पुणे पोलीस आयुक्तांचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ

आणीबाणी ही काँग्रेस सरकारची चुक होती- राहुल गांधी

धक्कादायक!; मंत्र्याचे सेक्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानं एकच खळबळ

छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदारच असुरक्षित- नाना पटोले

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More