बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे मी आज जिवंत आहे”

मुंबई | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. अनेक लोकांना बेड मिळत नव्हते तर अनेकांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं. त्यातच आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना काळातील परिस्थितीवरून  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

कोविड काळामध्ये मी कोमामध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या तब्येतीबद्दलच्या सगळ्या घडामोडींवर मुख्यमंत्र्याचं लक्ष्य होतं. त्यांच्यामुळे मी जिवंत आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ठाणे महापालिका निवडणुकीवर देखील भाष्य केलं आहे.

ठाण्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली आहे. महाविकास आघाडी करायची आहे आणि आम्ही त्यासाठी तयार आहोत. आता कोणीही काहीही बोलणार नाही. संजय राऊत यांच्या पाठीशी सुप्रिया सुळे उभे राहतात. तसेच सर्व कार्यकर्त्यांना घेवून मनोमिलन करणं गरजेचं आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकला चलो रे ची घोषणा होण्याची शक्यता असून भाजप हाच आपला शत्रू आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 2019 जेव्हा मध्ये 162 आमदार जमले होते तेव्हा कर्ता करविता मीच होतो. त्यामुळे आताही टीका होणार आहे. मिनिमम कॉमन प्रोग्रॅमवर चर्चा केली जाईल. मी माझ्या पक्षाकडून बोलतोय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

थोेडक्यात बातम्या- 

“मी पहाटे 5 वाजता उठूनही काम करायला तयार पण…”

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर जोरदार प्रहार

‘लफडा झाला वाकडा तिकडा’, नागराज मुंजळेच्या चित्रपटातील दुसरं भन्नाट गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडीओ

Corona Update: कोरोना नियमांविषयी आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More