मुंबई | बॉलीवूडचा सिंघम अजय देवगनच्या एका चाहत्याला कर्करोग झाला आहे. अजय जाहिरात करत असलेला गुटखा मी अनेक वर्षांपासून खात होतो. त्यामुळेच मला कर्करोग झाला आहे, असं त्या चाहत्याने म्हटलं आहे.
सर्वजण ज्या जाहिरातीबाबत बोलत आहेत, ती जाहिरात तंबाखू, गुटख्याची नसून वेलचीची आहे. त्यांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की, त्या पदार्थांमध्ये तंबाखू नसून केवळ वेलची आहे, या प्रकरणी स्पष्टीकरण देताना असं अजय देवगन म्हणाला आहे.
अजय देवगनची तंबाखू (गुटखा) जाहिरात पाहून नानकराम मीणा याने गुटख्याचे सेवन सुरू केले, परंतू यामुळे त्याला कर्करोग झाला. नानकराम हा राजस्थानमधील रहिवासी असून, अजयने तंबाखू आणि तंबाखूजन्य जाहिरात करू नये, अशी विनंती त्याने केली आहे.
नानकरामने जयपूर, सांगानेर, जगतपुरा आणि आसपासच्या परिसरात 1 हजार पत्रके वाटली आणि भिंतीवर चिटकवली आहेत. त्यामध्ये तंबाखूच्या सेवनाने होणारे परिणाम, त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेली परिस्थिती याबाबतची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-शहा म्हणतात लोकशाहीची गळचेपी होते; विक्रम गोखले शब्दाला जागणारे; जितेंद्र आव्हाडांचा टोला
-“देशाचा पंतप्रधान होण्याची पात्रता राहुल गांधींमध्ये नाही”
-भारतीय संघात ‘या’ खेळाडूची जागा कोणीच घेऊ शकत नाही- विरेंद्र सेहवाग
-ममता बॅनर्जींचं वागणं सद्दाम हुसैनसारखं; विवेक ओबेराॅयचे टीकास्त्र
-“मी भाजप सोडल्यामुळे अडवाणींचे डोळे पाणावले”
Comments are closed.