बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आशिष शेलारांना ‘ते’ वक्तव्य भोवणार; किशोरी पेडणेकरांनी लिहिलं थेट गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई | वरळी येथे बीडीडी चाळीत गॅससिलेंडरचा स्फोट झाल्याने एकाच परिवारातील चौघेजण गंभीर रित्या जखमी झाले होते. त्यानंतर या चौघांना तात्काळ नायर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान, लहान बालक, वडिल आणि आईचाही मृत्यु झाला आहे. त्यावरून भाजप (BJP) नेते आणि आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर खालच्या स्तरात टीका केली होती. त्यावरून आता किशोरी पेडणेकर यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

सदर सिलेंडर स्फोटाची घटना 30 नोव्हेंबर रोजी घडली होती. आशिष शेलार यांनी 4 डिसेंबरला पत्रकार परिषद घेत सिलेंडर स्फोटानंतर मुंबईचे महापौर 72 तासानंतर पोहोचतात. एवढे तास कुठे निजला होतात, असं वक्तव्य आशिष शेलारांनी केलं होतं. त्यावरून आता किशोरी पेडणेकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांना पत्र लिहिलं आहे.

मुंबईची महापौर ही एक महिला आहे तसेच प्रथम नागरिक असून ते एक महत्त्वाचे पद आहे. असे असूनही माझ्याबाबत उद्गारलेले शब्दप्रयोग आक्षेपार्ह असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करत आहे, असं पेडणेकर म्हणाल्या आहेत. तसेच आशिष शेलार यांनी जो शब्दप्रयोग केला त्यामुळे माझा व समस्त स्त्रीजातीचा अवमान केला आहे. या कारणामुळे आशिष शेलार यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचं किशोरी पेडणेकरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी किशोरी पेडणेकरांबाबत अशोभनिय वक्तव्य केलं असल्याने महिला आयोगाकडून (Commission for Women) अहवाल मागवण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांनी तक्रार केल्याने आशिष शेलार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

Covishield की Covaxin? ओमिक्राॅनवर कोणती लस प्रभावी?, तज्ज्ञ म्हणतात…

‘…तोपर्यंत निवडणुका नकोच’; राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

काय सांगता! फक्त 3 मिनिटात तब्बल 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं

“सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना…”

ना बँडबाजा, ना वरात! जितेंद्र आव्हाडांच्या लेकीच्या लग्नाची एकच चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More