बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, मी माझी भूमिका मांडली आता… – रामदास आठवले

नागपूर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमधील एका कार्यक्रमात बोलताना युतीचे संकेत दिले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. त्यानंतर दिवसभर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी युतीचे संकेत दिले आहेत.

शिवसेनेला राष्ट्रवादीसोबत राहून काहीच फायदा नाही. महाविकास आघाडी सरकार ही अनैसर्गिक आहे. त्याउलट भाजप- सेना युती ही 25 वर्ष जुनी आहे. दोन्ही पक्षामध्ये काही मतभेद असतील ते दूर करावेत आणि त्यासाठी भाजप नेत्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. यासाठी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं.

भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी. दोन्ही पक्षाने एकत्रित येऊन चर्चा सरकार स्थापन करावं, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मी नेहमी संपर्कात असतो. मी माझी भूमिका मांडली आहे. अजूनही वेळ गेली नाही, आता भाजपने पुढाकार घ्यावा, असंही आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, संजय राऊत, अब्दुल सत्तार, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्यानं आता सेना भाजप युती होणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.

थोडक्यात बातम्या-

ज्यावेळेस ‘ते’ येतील त्यावेळी ते भावी सहकारी – बाळासाहेब थोरात

पंतप्रधान मोदींना आपल्या मधुर आवाजात अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा! पाहा व्हिडीओ

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

सोनू सूदच्या अडचणीत वाढ???, आयकर विभागाच्या हाती लागली ‘ती’ कागदपत्रे!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More