बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खासदारकी मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो- संभाजीराजे भोसले

कोल्हापूर | भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेवर, संभाजीराजे भोसले मान्य करत नसले तरी ते ऑन पेपर ते भाजपचेच खासदार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. पाटलांच्या या वक्तव्याला संभाजीराजेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, हे पद मागायला मी भाजपकडे गेलो नव्हतो त्यांनी स्वतःहून मला हे पद सन्मानाने दिलं आहे, असं संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजेंनी आज मराठा आरक्षणाचा पहिला मूक मोर्चा काढला. काल आंदोलनस्थळी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते.

कोणी कितीही कागदपत्रे दाखवत असतील, पुरावे दाखवत असतील तर ते त्यांना दाखवू द्या. मी भाजपचा सहयोगी सदस्य आहे पण खासदारकी मागण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो नव्हतो. ते स्वतः माझ्याकडे आले होते. त्यांनी मला सन्मानपूर्वक हे पद दिले. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकच करतो, असं संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस असो वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो वा उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांशी माझे चांगलं जमतं. राज ठाकरे हेदेखील मला जवळचे आहेत. आता तर प्रकाश आंबेडकर हेसुद्धा जवळचे झाले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षात आपले चांगले संबंध असल्याचं संभाजीराजे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

अभिमानास्पद! जागतिक पातळीवर पुण्याची उल्लेखनीय कामगिरी, ‘या’ स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

आनंदाची बातमी! कोरोना झाल्यावर वर्षभर…; रिसर्चमधून दिलासादायक खुलासा

कौतुकास्पद! 11 वर्षीय मुलीने साडी घालून स्केटींग करत केली लसीकरणाची जागृती

“शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार”

‘या’ गावातील लोक रोज रात्री होतात तुरुंगात बंदिस्त, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More