बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्यानंतर सलमानच्या किती गर्लफ्रेंड होत्या माहित नाही, मी त्याच्या संपर्कात नाही”

मुंबई | अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडून देखील बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमानने अजून लग्न केलं नाही. आजवर सलमानचं बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने छाप पाडणारी पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अली आणि सलमान दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा देखील काही वर्षांपूर्वी चालू होत्या.

सोमी अलीने नुकतीच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फिल्मी करियर व्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील बरेच खुलासे केले आहेत. सोमी अली सलमानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. याविषयी बोलताना सोमी म्हणाली की, सलमान खानने त्यावेळी नुकतंच होम प्रोडक्शन सुरू केलं होतं. तो आपल्या ‘बुलंद’ चित्रपटासाठी प्रमुख अभिनेत्री शोधत होता. त्यासाठी माझी निवड करण्यात आली होती. या चित्रपटाचे शुटिंग करण्यासाठी आम्ही काठमांडूला गेलो होतो. परंतु, त्यानंतर काही कारणाने चित्रपटाचं शुटिंग थांबवण्यात आलं.

सोमीला सलमान खानच्या संपर्कात आहे का? असा प्रश्न केल्यावर सोमी म्हणाली की, मी सलमानसोबत गेले पाच वर्ष बोलले नाही. मला असं वाटतं की, आयुष्यात आपण पुढे जाणं गरजेचं आहे. 1999 मध्ये आम्ही विभक्त झालो, त्यानंतर त्याच्या किती गर्लफेंड होत्या हे मला माहित नाही. सलमान ‘बीइंग ह्युमन’ या सारखी संघटना चालवतो याचा मला अभिमान वाटतो.

तसेच बॉलिवूडमध्ये जर एखादी चांगली भूमिका मिळाली तर मी नक्कीच परत येण्याचा विचार करेल, असं देखील सोमी तिच्या कमबॅकविषयी बोलताना म्हणाली आहे. सध्या सोमीने स्वत:ला चित्रपटसृष्टीपासून लांब केलं असून, ती ‘नो मोर टियर्स’ ही स्वयंसेवी संस्था चालवते. ज्या महिलांवर घरगूती हिंसाचार होतो, त्यांच्या मदतीसाठी ती काम करते.

थोडक्यात बातम्या – 

‘प्रसुती वेदना सुरू झाल्यात, बाळाला बघायला नक्की या’; प्राजक्ताची भन्नाट पोस्ट

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

संसार थाटल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच ‘या’ अभिनेत्याच्या नात्यात आला दुरावा?

महिलेच्या अंगावर बसून मारहाण, पोलिसाच्या व्हायरल व्हिडीओनं देशभर संताप

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More