बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अण्णा भाऊ साठे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये मला काहीही फरक दिसत नाही- मोहन भागवत

मुंबई | अण्णा भाऊ साठेंप्रमाणेच सावरकरांचे कर्तृत्व होते. मला अण्णा भाऊ साठे आणि सावरकरांमध्ये कसलाही फरक दिसत नाही, असं सांगतानाच अण्णा भाऊ साठे हे एक धार्मिक व्यक्तीमत्त्व होतं. त्यांनी सत्याची तपश्चर्या केली. सत्य, करुणा, सुचिता आणि तपस्या या चार शब्दात त्यांचं पूर्ण जीवन होतं, असंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

अण्णा भाऊ साठे यांचं कार्य मोठं आहे. प्रामाणिकता हा त्यांचा मोठा गुण होता, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. विवेक साप्ताहिकाच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत यांनी हे मत व्यक्त केलं आहे.

जगाचं दुःख दूर करण्यासाठी त्या व्यक्तीला दुःखाचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा, असं कदाचित नियतीला वाटत असेल असं वाटतं. अण्णा भाऊ साठे यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणाची अशी उच्च प्रतिभा असावी तर ती सावरकरांमध्ये होती, असं त्यांनी सांगितलं.

जगात प्रामाणिकता हा दुर्मिळ गुण आहे. पण तो त्यांच्याकडे होता. ते जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रामाणिकपणे जगले. त्यांच्या एवढा प्रामाणिकपणा आमच्या पुढारी मंडळींमध्ये आला तर देश कित्येक पटीने पुढे जाईल. प्रामाणिकपणा हा जन्मजात असावा लागतो, असं मोहन भागवत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

कोरोना लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांना अजित पवारांचा इशारा, म्हणाले…

अमोल कोल्हे म्हणतात, “…मग त्यांना जातीवादाची कावीळ झालीये, असं म्हणावं लागेल”

“…तर विरोधकांनी याची काळजी घ्यावी”, उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना डिवचलं

“ना कसली शंका ना स्पर्धा, आम्ही आरामात 350 जागांचा आकडा पार करू”

सर्वात महागडा घटस्फोट; प्रसिद्ध उद्योगपतीच्या बायकोनं मागितली तब्बल ‘इतकी’ पोटगी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More